महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची गुरुवार, ०६ जून, २०१३
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्मात्याच्या 9 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रकाची 1 जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या 127 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 5 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात शिपाई पदाच्या 4 जागा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात सरळसेवेद्वारे शिपाई (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात http://mahafood.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमालाच्या 194 जागा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल (194 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

‘महाऑप’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा