|
|

'Lokrajya is a jewel of Maharashtra' रविवार, ७ मार्च, २०१०
लोकराज्यचा नुकताच प्रकाशित झालेला मार्च महिन्याचा अंक हा महिला दिन विशेषांक आहे. अर्थातच विशेषांक हे लोकराज्यचे विशेष आकर्षण ठरू लागले आहे. असे असले तरीही शासनाने जनतेसाठी काय केले आहे किंवा यापुढे शासन कोणती पावले उचलणार आहे याबाबतची माहिती अशा अंकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवणे हाच या अंकाचा मुख्य उद्देश आहे.
वाचकांनीही लोकराज्यच्या अशा विशेषांकांना मोठा प्रतिसाद दिल्याचे यापूर्वी आपण पाहिले आहेच. म्हणूनच अमरावतीच्या मोहन वाघ यांनी लोकराज्यविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना 'Lokrajya is a jewel of Maharashtra' असे म्हटले आहे.
अनेक वाचक असे आहेत की जे आपल्या आवडीच्या विषयाबाबत शासनाकडून उपक्रम सुरू व्हावेत अशी इच्छा व्यक्त करीत असतात. अजित कराड यांनी 'Please start agricultural related job fair' अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर मुंबईच्या शीतल म्हात्रे यांनी आपली इच्छा व्यक्त करताना 'Please start folk arts in details and Lokrajya issue on central Government schemes' असे म्हटले आहे.
शासनाची भूमिका आणि कार्य जनतेसमोर नेण्यात आणि त्याला मिळणार्या वाचकांच्या प्रतिसादातच लोकराज्यचे यश आहे.
केवळ ५० रुपयांत लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधा - सहायक संचालक (माहिती), वितरण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, बरॅक नं. १९, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई- ४०० ०२१ दूरध्वनी क्र. (०२२) २२०२१५३०, २२०२३९५७, |
|