|
|

सामुहिक विवाह ही काळाची गरज-बाळासाहेब थोरात मंगळवार, ९ मार्च, २०१०
लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर होणार्या अनावश्यक खर्चास आळा घालण्यासाठी सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
पेठ (जि. नाशिक) येथील आदिवासी महिला हक्क समिती तर्फे कापुरझीरापाडा पेठ येथे सोमवारी आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात एक हजार जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. थोरात बोलत होते. यावेळी आमदार जयप्रकाश छाजेड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिगंबर गिते, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. थोरात म्हणाले, लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर वधूवरांच्या आईवडीलांना आर्थिक भार सोसावा लागतो, हा अर्थिक भार टाळण्यासाठी सामुहिक विवाह सोहळ्यात वधूवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
यावेळी श्री. थोरात यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच आदिवासी महिला हक्क समितीच्या बाल सदनाच्या नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावा
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरीता शिक्षकांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. नाशिक महानगर पालिकेच्या शाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन श्री. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नयना घोलप, आमदार जयप्रकाश छाजेड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण पध्दतीचा नवा मसुदा तयार करण्याचे काम सुरु असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी श्री. थोरात यांनी केले. 'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|