Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य



पॅकेजच्या अंमलबजावणीसोबत शेतकर्‍यांमध्ये जागृतीची आवश्यकता - नारायण राणे
मंगळवार, ९ मार्च, २०१०

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पॅकेजच्या अंमलबजावणी सोबतच व्यापक प्रमाणावर जाणीव जागृतीची आवश्यकता असल्याचे मत महसूल मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शेतकरी पॅकेज संदर्भात मंगळवारी आयोजित विभागीय आढावा बैठकीत अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना श्री. राणे बोलत होते. यावेळी अमरावतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार विरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त दिनेश वाघमारे, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक शिवानंद जी माळाकोळीकर, अतिरिक्त आयुक्त नवीन सोना तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

शेतकरी पॅकेजची अंमलबजावणी करताना संख्यात्मक बाबींचा विचार तर झालाच पाहिजे त्याचबरोबर गुणात्मक आणि दीर्घकाळ लाभदायक ठरतील अशा उपक्रमांवर भर द्यावा, असे सांगून श्री. राणे म्हणाले, पॅकेजच्या माध्यमातून शेतकर्‍यांची वाटचाल आत्महत्येकडून आत्मसन्मानाच्या दिशेने न्यायची असेल तर भक्कम अशा बाजारपेठेची निर्मितीही प्रशासनाच्या प्रयत्नातून झाली पाहिजे.

बुलडाण्यापासून थेट अमरावतीपर्यंत येताना विविध आत्महत्याग्रस्त गावांतील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या त्यावेळी असे लक्षात आले की, शेतकरी आत्महत्या केवळ अर्थसहाय्यातून संपणार नाहीत, शेतकर्‍यांच्या अनेक समस्या हा त्यांच्या सामाजिक जडण-घडणीतून निर्माण झालेल्या आहेत. त्यासाठी त्यांचे सामाजिक जीवनमान लक्षात घेवून प्रशासन, लोकप्रतिनिधी, अशासकीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून जाणीव जागृती होणे गरजेचे आहे. ही जाणीव जागृती करताना त्यांच्या सांस्कृतिक मुल्यांचा आणि लोकजीवनाचाही आदर व्हावा, अशा सूचनाही श्री. राणे यांनी दिल्या.

या बैठकीत कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, पॅकेज अंमलबजावणी विभागातील अधिकार्‍यांनी आपल्या विभागाशी संबंधित पॅकेज अंमलबजावणीची माहिती दिली.

अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आवश्यक संपूर्ण मदत

नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांना आवश्यक सर्व मदत देण्याचे धोरण शासनाने स्विकारले असून शेती व पुरक व्यवसायासाठी संपूर्ण मदत देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री नारायण राणे यांनी अमरावती जिल्ह्यातील बोपी व लोणी येथील शेतकर्‍यांशी थेट संवाद साधताना दिली.

यावेळी श्री. राणे यांच्या समवेत आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, विभागीय आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी रिचा बागला आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांशी बोलताना श्री. राणे म्हणाले, आर्थिक संकटात सापडूनही आपण ज्या सहजतेने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली हे इतर शेतकर्‍यांना प्रेरणादायी आहे. शासनाकडे केवळ मागण्या न मागता पॅकेज अंतर्गत दिलेल्या सुविधेंचा लाभ घेवून आपण शेती फुलविली.

शेतकर्‍यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नासंदर्भात बोलताना श्री.राणे पुढे म्हणाले की, अपुर्‍या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. परंतु ज्या पिकांना मागणी आहे, असेच उत्पादन आपण घेतले पाहिजे. कृषी व कृषीवर आधारित उद्योग सुरू करावे तसेच उत्पादन वाढीचे प्रयोग राबवावे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे परिश्रमाने ऊस व ऊसापासून उत्पादन घेतले जाते त्याच धर्तीवर विदर्भातही कापूस व सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग सुरू करा, शासन आपल्या सोबत आहे. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शेतकर्‍यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा


केंद्र व राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या उन्नतीकरीता पॅकेज अंतर्गत विविध योजनांची अमलबजावणी केल्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत झाली आहे. शासनाच्या विविध विभागाचे वतीने कृषिविषयक तसेच अन्य योजना राबविल्या जात आहेत, अशा विविध योजनांचा शेतकर्‍यांनी लाभ घेवून स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन महसूल मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बाभुळगांव (जहां.) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. राणे यांनी सोमवारी अकोला जिल्ह्यातील दौर्‍यामध्ये शेतकर्‍यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रारंभी श्री. राणे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील सदस्यांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते म्हणाले, शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक तेथे बोअरवेल तयार करण्यात येतील. शेतकर्‍यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. आत्महत्याग्रस्त कुटूंबांनी खचून न जाता परिस्थितीचा हिंमतीने सामना करावा. शासनाच्या प्रयत्नालाही तेवढेच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219931